धरणगाव (प्रतिनिधी) येथील स्टेट बँकेजवळ असणाऱ्या किकाभाई अँड कादरभाई सन्स या खासगी पेट्रोल पंपावर १ व २ रुपयाचे चलनी नाणे स्वीकारण्यास नकार देत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे कुठलेही भारतीय चलन रिर्जव्ह बँकेच्या सूचनेशिवाय अशा पद्धतीने न स्वीकारणे कायदेशीर गुन्हा आहे.
येथील पेट्रोलपंपचालकाने चक्क एक व दोन रुपयांचे चलनी नाणे स्विकारले जाणार नाही, चक्क असे पोस्टरच लावले आहे. एक व दोन रुपयाचे चलनी नाणे व्यवहारातून बंद झालेले नाही, तरी नाणी घेण्यास नकार देणे हा गुन्हा आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेस दैनंदिन व्यवहारात अडचणी येत असून संभ्रम निर्माण होणे ही बाब अतिशय गंभीर आहे. एक व दोन रुपयाचे चलनी नाणे बंद झाल्याबाबत भारत सरकार अथवा भारतीय रिर्जव्ह बँकेकडून अधिकृतपणे घोषित करण्यात आलेले नाही. चलनातील ही नाणी चलनात वापरण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे भारत सरकार व भारतीय रिर्जव्ह बँक यांनी अधिकृत केलेली सर्व प्रकारची चलनी नाणी सर्व प्रकारचे दुकानदार, सर्व प्रकारच्या बँका तसेच कोणत्याही व्यक्तीने व्यवहारात स्वीकारणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोणत्याही दुकानदार, बँक अधिकारी तसेच कोणत्याही व्यक्तीने भारत सरकार व भारतीय रिर्जव्ह बँकेने अधिकृत केलेले कोणत्याही प्रकारचे चलनी नाणे व्यवहारात स्विकारण्यास नकार दिल्यास अथवा टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर भारतीय चलन न स्वीकारल्यास संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र धरणगाव येथील पेट्रोल पंप चालकाने चक्क दर्शनी जागेवर पोस्टरच लावल्याने जनतेत आश्चर्य व्यक्त होत असून संबंधित पंप चालकांवर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.
चलनातील नाण्यांसाठीचे नियम
नियमानुसार चलनात असलेले नाणे घेण्यास कुणी नकार दिला तर त्याच्या विरुद्ध एफआयआर दाखल करता येतो. भारतीय मुद्रा अधिनियम व इंडिअन पिनल कोड खाली संबंधितावर कारवाई केली जाते. तसेच रिझर्व बँकेकडे या संदर्भात तक्रार नोंदविता येते.