पाचोरा – प्रतिनिधी | धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म संवाद (सोशियल नेटवर्किंग ग्रुप) फुले, शाहु, आंबेडकर विचार मंच व डॉ. आंबेडकर विचारधारा अभ्यास मंडळ (क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) यांच्या संयुक्त विद्यमाने ”धम्मविचार प्रबोधन मालिका” दि. १४ ते २५ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे.
या धम्मविचार प्रबोधन मालिकेमध्ये झुम अॅप, फेसबुक आणि यु टुबद्वारे सहभागी होता येईल. कार्यक्रमाची भूमिका प्रमुख आयोजक प्रा. म. सु. पगारे मांडतील. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील समारोपासाठी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार उपस्थित राहणार आहेत. .
दि. १४ ऑक्टोबररोजी वक्ते – भन्ते ज्ञानज्योती महाथेरो, (वरोरा) व प्रो.डॉ. म. सु. पगारे क्रांती आणि प्रतिक्रांती भूमिका या विषयावर बोलतील सूत्रसंचालन -प्रा. विजय घोरपडे राहतील दि. १५ ऑक्टोबररोजी वक्ते – भन्ते अश्वजित महाथेरो धम्म संस्कार वर्गाच्या माध्यमातून बौद्धमय होणारा समाज या विषयावर बोलतील सुत्रसंचालन – प्रा.अरूण अवसरमल करतील दि. १६ ऑक्टोबररोजी वक्ते – आचार्य महानागरत्न, (नांदेड) समथ विपश्यना – एक विशुध्दीमार्ग या विषयावर बोलतील सुत्रसंचालन प्रा. वनश्री बैसाने करतील दि. १७ ऑक्टोबररोजी वक्ते – भन्ते उपगुप्त महाथेरो, (पुर्णा) विज्ञानाच्या पुढील टप्पा म्हणजेच बुद्धीझम या विषयावर बोलतील सुत्रसंचालन बाबूराव वाघ करतील
. १९ ऑक्टोबररोजी वक्ते – भन्ते धम्मबोधी (औरंगाबाद) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म कार्यातील विविध अनुभव या विषयावर बोलतील दि. २० ऑक्टोबर रोजी वक्ते – भन्ते आनंद महाथेरो (मुंबई) – माझ्या ५३ वर्षातील बौद्ध धम्माच्या अनुभुतीचा विकसनशील प्रवास या विषयावर बोलतील दि. २१ ऑक्टोबररोजी
वक्ते – भन्ते ज्ञानरक्षित (औरंगाबाद) निर्वाण मार्गाने प्रवास करणाऱ्या साधकाच्या प्रवासातील अडथळे या विषयावर बोलतील
दि. २२ ऑक्टोबररोजी वक्ते – भन्ते खेमधम्मो (मूळावा) जीवन जगण्याची कला म्हणजे धम्म या विषयावर बोलतील दि. २३ ऑक्टोबररोजी वक्ते – भन्ते बी संघपाल (मुंबई) मनाच्या निर्मळतेसाठी धम्माचा सद्उपयोग या विषयावर बोलतील दि. २४ ऑक्टोबररोजी वक्ते – पु. धम्मदर्शना माताजी महाथेरो (औरंगाबाद)
भिक्खूणी संघाचा थेरी पदाकडील प्रवास या विषयावर बोलतील दि. २५ ऑक्टोबररोजी भन्ते धम्मरक्षित महाथेरो, उदना, (सूरत) पंचशील से निब्बाण तक या विषयावर बोलतील
या कार्यक्रमासाठी अभ्यासकांनी जास्तीत जास्त संख्येने Http://www.facebook.com/248125532924105/?ref आणि www.youtube.com/channel/UCp8zLJkNblv8067_nM50-A? View व Zoom 2756274802. Pass 2020 या लिंकद्वारे सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे .