धनगरवाड्यात एकावर धारदार शस्त्राने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  काकाला विनाकारण शिवीगाळ करत असल्याने पुतण्या हा समजविण्यास गेला असता, पुतण्यावर एकाने धारदार शस्त्राने वार करत जखमी केल्याची घटना जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील धनगरवाडा येथे घडली, याप्रकरणी एका जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पिंप्राळा परिसरातील धनगरवाडा येथे राजेंद्र रत्न धनगर वय ५५ हे वास्तव्यास आहेत. गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास राजेंद्र धनगर यांच्या काकाला धनगरवाडा येथेच राहणारा दादू भरत धनगर हा विनाकारण शिवीगाळ करत होता, दादू यास समजविण्यासाठी राजेंद्र धनगर गेले असता, दादू याने धारदार शस्त्राने राजेंद्र याच्या हातावर वार करुन जखमी केले, तसेच यानंतर राजेंद्र धनगर व त्यांचा मुलगा नितीन धनगर या दोघांनाही दादू धनगर याने तुम्ही मला बाहेर भेटले तर मी तुम्हाला छाटून टाकेन असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या जखमी राजेंद्र धनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दादू धनगर याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी हे करीत आहेत.

Protected Content