वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नंदगाव येथे परिसरातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनावर जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नंदगाव परिसरातून बेकायदेशीर रित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गुरुवार ९ मार्च रोजी जळगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर क्रमांक एमएच ०९ ईएम ६६४९) या महिंद्रा पिकअप व्हॅन पकडले. वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यानंतर पोलिसांनी चालक जितेंद्र सोपान बाभुळकर रा. साकेगाव ता. भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करीत आहे.

Protected Content