धक्कादायक : रावेर वैद्यकीय अधिक्षकांची बनावट सही शिक्याचा वापर

रावेर, प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. एन. डी. महाजन यांची बनावट सही, शिक्का व बनावट पत्र तयार करून मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयास बदली मेळघाट गडचिरोली येथे करून मिळावी मागणी केल्याचे प्रकरण गुरुवारी उघड झाले आहे. या प्रकरणी डॉ. एन.  डी. महाजन यांनी रावेर पोलिसांत तक्रार दाखल करत, जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे देखील याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

 

येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.एन.डी.महाजन यांनी कोरोना काळात अतिशय जबाबदारीने कार्य पार पाडले.यामुळे वेळेत ऑक्सिजन , उपचार देता आले.अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.मात्र त्यांच्या कामाच्या पद्धती आणि ग्रामीण रुग्णालयात कुणाचा हस्तक्षेप खपवून घेण्यास त्यांचा मज्जाव असल्याने , त्यांना यंत्रणेतून विरोध झाल्याचे काही प्रकार अलीकडे घडले असतांना , आता आणखी लेटर बॉम्ब उघडकीस आले आहे . त्यांच्या कार्यालयातील लेटरपॅडसारखी खोटी लेटरपॅड तयार करून , मेडिकल ऑफिसर रुरल हॉस्पिटल रावेर या नावाचा खोटा शिक्का करून प्रिन्सिपल सेक्रेटरी मुंबई यांच्याकडे खोट्या सहीने मेळघाट किंवा गडचिरोली मध्ये बदली करून मिळावी अशी मागणी केलेले बनावट पत्र देण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली असता , पत्राची नक्कल आणि त्यावरील जावक नंबर घेऊन पोलिसात तक्रार केली आहे.या पात्रावरील जावक क्रमांक देखील खोटा आहे.तर पत्र देखील त्यांच्याकडे टाईप केलेले नसल्याचे डॉ.महाजन यांचे म्हणणे आहे.सदरील पत्र ११ जून रोजी पाठवण्यात आले आहे.त्यामुळे त्यांना मनस्ताप होत आहे.याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे .

 

Protected Content