जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला मानेवर चाकू लावून दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एकावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शनिपेठ हद्दीत २२ वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी विनोद सुकलाल भोळे याने तरुणीच्या घरात येऊन तिच्या मानेला चाकू लावत तिला ओढत नेत घरात मागे असलेल्या नाल्यात घेवून गेला. त्यानंतर पुन्हा घरात आणून तिच्या हाताच्या बोटावर चाकूने जखमी केले आणि तरूणीला खाटेवर ढकलून देत तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. दरम्यान, या संदर्भात तरुणीने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तरूणीच्या तक्रारीवरून मंगळवार ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विनोद सुकलाल भोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहे.