नशिराबाद प्रतिनिधी । शहरातील साथी बाजार चौकातील भाजीपाला विक्रेता ७० वर्षीय वृध्दाला जिल्हा कोवीड रूग्णालयात संशयित दाखल केले असता शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणा नशिराबाद येथे दाखल झाले असून उपाय योजनाचे काम सुरू असल्याचे अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेष करून वयोवृध्दाला यांची लागण अधिक प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील नशिराबाद येथील साथी बाजार चौकातील भाजीपाला विक्रेते ७० वर्षीय वयोवृध्दाला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांना गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा कोवीड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शनिवारी रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा अहवाला पॉझिटीव्ह आल्याचे ग्रामीण आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांनी सांगितले. ग्रामीण आरोग्य यंत्रणा नशिराबाद
संपर्काती सर्वांचा शोध सुरू
साथीबाजार परिसरात राहणारे ७० वर्षीय व्यक्ती हे भाजीपाला विक्रेते आहे. दररोज ते सकाळी ३ वाजता उठून जळगावा कृषीउत्पन्न बाजार समितीत भाजीपाला घेण्यासाठी जातात. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना दमा आणि टायफाईडचा त्रास जाणवू लागल्याने गावातील तीन डॉक्टरांकडे त्यांनी तपासणी केली होती. जिल्हा कोवीड रूग्णालयात दाखल झाले. त्यात त्याचा शनिवारी मृत्यू झाला.
गावातील ४० जणांना केले क्वारंटाईन
दरम्यान, वयोवृध्द हे भाजीपाला विक्रेते असल्याने कृषीउत्पन्न बाजार समितीत भाजीपाला घेण्यासाठी जातात. आता त्यांच्या संपर्कात किती लोक आले होते. याची माहिती तालुका आरोग्य यंत्रणा करीत आहे. गावातील तीन डॉक्टर, भाजीपाला नेआण करणारा रिक्षा चालक असे ४० जणांना क्वारंटाईन केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण सांगितले.