धुळे प्रतिनिधी । साक्री येथील कोरोना संशयित ५३ वर्षीय व्यक्तीला ८ एप्रिल रोजी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. परंतु त्यांचा आज पहाटेपूर्वी १.३० वाजता मृत्यू झाला. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. हा धुळे जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहे.
तसेच मालेगाव येथील एक महिला रुग्ण ९ एप्रिल, २०२० रोजी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलगिकरण कक्षात दाखल असून तिचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे डॉ.आर. आय. सुर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल अधिकारी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय यांनी कळविले आहे.