धक्कादायक : ‘तो’ आरोपी निघाला वासनांध ‘सिरीयल किलर’; तीन खुनांची कबुली ! (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. संशयित आरोपी यश पाटील हा चक्क ‘सिरीयल किलर’ निघालाय. त्याने डांभूर्णीच नव्हे तर भडगाव, भोकर येथे देखील बालकांशी अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर खून केले आहेत.

संशयित आरोपी यश पाटील यला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पोलीस चौकशीत त्याने मुलास आमिष दखवत शेतात एकांतात अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर हत्या केल्याची कबुली दिली आहे. एवढेच नाही तर काही दिवसांपुर्वी जळगाव तालुक्यातील भोकर आणि भडगाव येथे विद्यार्थ्यांची हत्यादेखील केल्याचे कबूल केले आहे.

१. डांभुर्णी येथील मुलाची हत्या
यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील दहावीत शिकणारा १६ वर्षीय मुलगा कैलास चंद्रकांत कोळी याचा मृतदेह डांभूर्णी शेतशिवारात शुक्रवारी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास आढळून आला होता. डोळ्यांमध्ये काड्या खुपसून आणि डोक्यात दगड आणि विटांनी मारहाण करून जबर जखमी केले होते. कैलासचा मृतदेह हा गावातील दत्तात्रय माणिकराव पाटील यांच्या शेतात आढळून आला होता. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान रात्री उशीरापर्यंत यावल पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डांभुर्णी निर्घृण हत्या प्रकरण : आरोपीला नेताना पोलिसांच्या वाहनावर दगडफेक !

२. भोकर येथील बेपत्ता विद्यार्थ्यांचा अर्थनग्न अवस्थेत सापडला होता मृतदेह

१२ मार्च २०२० रोजी रोहित नवल सैंदाणे (वय-११) रा. भोकर ता. जळगाव हा विद्यार्थी सायंकाळी ५ वाजेनंतर बेपत्ता झाला होता. या विद्यार्थ्यांचा गावापासून हाकेच्या अंतरावरील भोकर गावापासून ५०० मीटरच्या अंतरावर असलेल्या मक्याच्या शेतात १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पायवाटेवर बालकाचा अर्थनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. गळा दाबून खून करण्यात आल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला होता. विशेष म्हणजे विद्यार्थ्याचे अपहरण करणार्‍या संशयिताचे रेखाचित्र जारी करण्यात आले होते.

भोकर येथील बेपत्ता विद्यार्थ्यांचा शेतात आढळला मृतदेह

३. भडगाव येथील नऊ वर्षीय बालकाचा निर्घृण हत्या

भडगाव येथे बांगडी बनविण्याचा व्यवसाय करणारे बाबू सय्यद यांचा नऊ वर्षीय मुलगा इसम सय्यद हा २१ मार्च २०१९ रोजी बेपत्ता झाला होता. २२ मार्चला दुपारच्या सुमारास भडगाव येथील पाचोरा रोडवर केळीच्या शेतामध्ये त्याचा मृतदेह सापडला. त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते त्याचा अधिक तपास सुरू पोलिसांकडून सुरू असताना ३० मार्च २०२० रोजी मध्यरात्री मुलाचे वडील बाबू सय्यद वय (48), आई पिंकी बाबू सय्यद (38), बहिण नेहा वय (16) यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. आधी मुलाची हत्यानंतर कुटुंबातील तीन व्यक्तींची आत्महत्या केल्याने भडगाव शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.

भडगाव येथे नऊ वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून

आज सकाळी संशयिताला अटक
संशयित आरोपी यश पाटील (वय-२६) रा. डांभुर्णी ता. यावल हा गावातीलच शेतकरी सुपडू रमेश साळुंखे यांच्या कोळन्हावी शेतशिवारात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली कोळन्हवी शेतशिवारातून पोका रणजित जाधव, नारायण पाटील, रवींद्र पाटील, अशरफ शेख, अरुण राजपूत, किशोर राठोड यांच्या पथकाने संशयित आरोपी यश पाटील याला ताब्यात घेतले आणि जळगाव येथे चौकशीसाठी आणण्यात आले.

गुन्ह्याची कबुली
आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीसाठी आणण्यात आले. यावेळी पोलीसांनी विश्वासात घेवून त्याची विचारपूस केली असता त्याने या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. अल्पवयीन मुलांना कोणत्याही गोष्टींचे आमिष दाखवत मुलास एकांतात घेवून जावून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत होता. हा प्रकार इतर कुणालाही कळु नये म्हणून संबंधित मुलाची निर्घृणपणे हत्या करत करायचा आणि त्यांची हत्या करत होता.

खळबळजनक : डांभुर्णी शिवारात अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या

डांभुर्णी येथील विद्यार्थ्याची हत्या करणारा संशयित गावातीलच यश पाटील हा तरुण असल्याची खात्री झाल्यावर पथकाने शनिवारी त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिकची चौकशी केली असता भोकर येथील विद्यार्थ्याचीही हत्या त्यानेच केल्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशय होता. त्यानुसार तपासाला वेग दिल्यावर संशयित यश पाटील यानेच भोकर आणि भडगाव येथील विद्यार्थ्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती विश्वसनिय सूत्रांकडून मिळाली आहे.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/237745130946113/

Protected Content