Home क्राईम भडगाव येथे नऊ वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून

भडगाव येथे नऊ वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून


bhadgaggg

भडगाव (सागर महाजन) ।भडगाव शहरातील पाचोरा रस्त्यालगत रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालय मागे केळीच्या शेतात एका नऊ वर्षाच्या बालकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या बाबत भडगाव पोलिस अधिक तपास करीत आहे. घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

या बाबत अधिक माहिती अशी की, ईसम बब्बु सय्यद ( वय 9) रा. फतेहपुर उत्तरप्रदेश ह.मू. भडगाव मृताचे वडील बब्बू सय्यद गेल्या एक वर्षापासून शहरातील टोणगा भागात वास्तव्यास होते. ते बांगडीचा व्यवसाय करून घराचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचा मुलगा ईसाम सय्यद हा काल गुरुवारी 4 वाजे पासून बेपत्ता होता. या बाबत भडगाव पोलिस स्टेशन ला हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. आज शुक्रवारी 4 वाजता शहरातील पाचोरा रस्त्यालगत रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालय मागे केळीच्या शेतात एका लहान मुलाचा मृतदेह आढळला असल्याची वार्ता गावात पसरताच त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेत हा मृतदेह ईसाम सय्यद ह्या बालकाचा असे निष्पन्न झाले. घटनास्थळी श्वान पथक बोलावण्यात आले. स्वानाने लाडकुबाई शाळे कडून टोंगाव भागातून पाचोरा रस्त्याचा मार्ग दाखवला.

याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक नजीर शेख, पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, पाचोरा पोलिस निरीक्षक अनिल पोलिस, पोलिस उपनिरीक्षक आनंद पठारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, ईश्र्वर पाटील, नितीन रावते आदींनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. यापुढील तपास भडगाव पोलिस करत आहे. मयत ईसमचा मृतुदेह शवविच्छेदनसाठी जळगाव येथे नेण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound