धक्कादायक : कोरोना व्हायरसची १५ ते २० नौसैनिकांना लागण !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील नौदलाच्या तळावरील १५ ते २० नौसैनिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या नौसैनिकांना नौदलाच्या रुग्णालयात क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

 

भारतीय नौदलाच्या करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २१ जवानांना मुंबईतील INHS या नेव्ही रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यात ‘आयएनएस आंग्रे’ या नौदलाच्या प्रशासकीय तळावर आढळलेल्या २० करोनाबाधित जवानांचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे, या जवानांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नव्हती. दरम्यान, भारतीय नौदलात करोना व्हायरसची लागण होण्याचे ही पहिलीच घटना आहे. या नौसैनिकांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढण्यासाठी मोठी शोध मोहिम सुरु झाली आहे.

Protected Content