पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका नराधमाने बलात्कार केले असून पीडित मुलगी ६ महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आई भावासह राहते. आई शेतीकाम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करते. साधारण सहा महिन्यापुर्वी पिडीत मुलीचे आई व भाऊ हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यादिवशी गावातील संशयित आरोपी रविंद्र शामराव पाटील ( पारोळा तालुक्यातील रहिवाशी) हा दारू पिऊन अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना रात्री ११ वाजता घरात आला. झोपेतच संशयित आरोपी रविंद्र पाटील याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दारू पिऊन दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास पुन्हा येवून मारहाण व शिवीगाळ करून पुन्हा अत्याचार केला. याबाबत कोणाला वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. दरम्यान, पिडीतेच्या आईला संशय आल्याने धुळे येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात तपासणी केली असता पिडीता सहा महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईने विश्वासात घेवून मुलीची विचारपूस केली असता संशयित आरोपी रविंद्र पाटील यानेच अत्याचार केल्याचे सांगितले. पिडीतेच्या फिर्यादीवरू पारोळा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वेय गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रविंद्र बागुल करीत आहे.