धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने गर्भवती होवून तिने तिने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात अंदाजे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिचे आईवडील हे उसतोडणीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. साधारण सात महिन्यांपुर्वी अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह बारामती तालुक्यातील फलटण जवळ उस तोडणीला गेले. तिथे झोपडी करून वास्तव्याला होते. पिडीत मुलगी ही घरी झोपडीत एकटी असतांना आरज्या (पुर्ण नाव माहिती नाही) याने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. मुलीने घरात घाबरून कुणाला काहीही सांगितले नाही. त्यानंतर कुटुंबिय पुन्हा मुळ गावी रावेर येथे परत आले. त्यानंतर मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले. तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पिडीत मुलीने मुलाला जन्म दिली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content