जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात आज दुपारी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने दोन हॉटेलवर छापा टाकून सात ते आठ जोडप्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौकशीचे काम सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील आर.एल.चौफुली ते जळगाव काटा दरम्यान एका हॉटेलवर आणि भुसावळ रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयजवळ असलेल्या एका हॉटेलवर अश्या दोन ठिकाणी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी सात ते आठ जोडप्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून सर्वांची चौकशीचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हॉटेल मालकाला बोलाविण्यात आले असून तरूणींच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जात आहे.