
रावेर, प्रतिनिधी| चार चाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून दिड लाख रुपये घेऊन ये म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या विरूद्ध रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पाडळा येथील माहेर असलेल्या २५ वर्षीय विवाहित महिलेला चार चाकी वाहन घेण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून दिड लाख रुपये घेऊन ये म्हणत शारीरिक व मानसिक छळ पती व सासरच्या मंडळींकडून करण्यात येत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले आहे. त्याचबरोबर वेळोवेळी फारकती घेण्याची धमकी पतीकडून देण्यात येते. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस स्थानकात पती मुकर तडवी, सासरे नासिर तडवी, सासू ऐनुर तडवी सर्व रा. पंचक ता.चोपडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोना सुनील वंजारी हे करीत आहेत.


