दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ व घटस्फोट देण्याची धमकी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चारचाकी घेण्यासाठी माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा मारहाण करत छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला. तसेच घटस्फोट देण्याची धमकी दिली. याप्रकरणी बुधवार ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील माहेर असलेल्या सरला मुकेश गायकवाड यांचा विवाह गुजरात राज्यातील नवसारी येथील मुकेश भगवान गायकवाड यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसानंतरच पती मुकेश गायकवाड याने चारचाकी घेण्यासाठी माहेरहून २ लाखांची मागणी विवाहितेकडे केली. विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थीती हालाखिची असल्याचे पैसे आणले नाही. या रागातून पती मुकेश गायकवाड याने विवाहितेला मारहाण करत घटस्फोट देण्याची धमकी दिली. तसेच सासरच्या मंडळींनी देखील पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पती मुकेश भगवान गायकवाड, सासू लताबाई भगवान गायकवाड, सासरे भगवान रामदास गायकवाड, दीर गणेश भगवान गायकवाड, दिराणी शितल गणेश गायकवाड, मनिषा मांगीलाल सपकाळे, उषा गोपाळ आंगळे सर्व रा. नवसारी गुजरात यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.

Protected Content