Home क्राईम दोन दुचाकीच्या अपघातात दोन जण जखमी

दोन दुचाकीच्या अपघातात दोन जण जखमी


नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील खिर्डी येथील कपूर पेट्रोलपंप समोर दोन दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तरूण आणि महिला गंभिररित्या जखमी झाल्याची घटना १३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली होती. जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर अखेर बुधवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुषार संजय कोळी हा तरूण आपल्या कुटुंबासह जळगाव तालुक्यातील खिर्डी येथे वास्तव्याला आहे. १३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता तुषार कोळी हा त्यांच्या गावातील महिला जानकाबाई अर्जून कोळी यांच्यासोबत दुचाकी एमएच १९ डीजी २७०२ ने जळगावात येत असतांना खिर्डी शिवारातील कपूर पेट्रोल पंपासमोर एका समोरून येणाऱ्या अज्ञात दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघात तुषार कोळी आणि जानकाबाई कोळी हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात उपारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर बुधवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound