मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या सदस्यांवर खोके घेतल्याचा निर्णय होत असतांना आता मंत्री केसरकर यांनी या प्रकरणी दोन दिवसात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी रग्गड पैसा घेऊन पक्षात फूट पाडल्याचा आरोप पहिल्या दिवसापासूनच होत आहे. यातूनच राज्यात ‘पन्नास खोके… सगळे ओके’ अशी घोषणा जन्माला आली आहे. याचा अर्थ प्रत्येक फुटीर आमदाराला पन्नास कोटी रूपये मिळाले असल्याने हे वाक्य चर्चेचा विषय बनले आहे. यावरून बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असला तरी यावरून आरोप सुरूच असतात.
या पार्श्वभूमिवर, आज मंत्री दीपक केसरकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, दोन दिवसात मी पत्रकार परिषद घेणार असून यात खोके नेमके कोण घेत होते याचा गौप्यस्फोट करणार आहे. याप्रसंगी त्यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका देखील केली.