जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश मंगळवार १३ डिसेंबर रोजी दुपारी काढले आहे.
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आकाश अजय सोनार (वय-२१) रा. लक्ष्मी नगर, जळगाव आणि अविनाश रामेश्वर राठोड (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे एकुण १० गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहावा म्हणून हद्दपार करण्याचा अहवाल एमआयडीसी पोलीसांनी तयार करून पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आला होता. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दोघांचे हद्दपारच्या प्रस्ताव मंजूर करून दोन्ही गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून १ वर्ष करीता हद्दपार करण्याचे आदेश मंगळवार १३ डिसेंबर रोजी दुपारी काढले आहे.
दोघांचे हद्दपारीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, सहाय्यक फौजदार युनूस शेख, सुनील दामोदरे, पोलीस नाईक सचिन पाटील, महिला पोलीस नाईक निलोफर सय्यद, सुधीर साळवे हेमंत कळसकर, साईनाथ मुंडे यांनी कारवाई करत दोन्ही गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.