दोघांकडून चिकन दुकानदारास मारहाण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील एका पोल्ट्री फॉर्म चिकन घेण्यासाठी गेलेल्या दोन जणांकडून चिकन दुकानदारास बेदम मारहाण व जिवे चार मारण्याची धमकी दिल्याचप प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अक्सानगर परिसरात राहणारे अख्तर शेख अय्युब (वय-२१) हा तरूण किरकोळ चिकन विक्रीचे दुकान लावून आपला उदरनिर्वाह करतो. याचे दुकान शहरातील महाजन पोल्ट्री फार्म समोर आहे.  शुक्रवारी २ जून रोजी  रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास यावल शहरातील डांगपुरा परिसरात राहणारे संशयीत शहेबाज शेख अमीन मऱ्यार व बबलु शेख अमीन मन्यार हे दोघ भाऊ चिकन घेण्यासाठी आले.  शहेबाज व बबलु या दोघांनी चिकन मटनमध्ये जबरस्ती कलेजी का दिली ? याचा राग आल्याने वाईट वाटुन दोघा संशयीतांनी मिळून चिकन दुकारास शिवीगाळ व चापटाबुक्यांनी मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी समजविण्यास गेलेला अख्तर शेखचा मोहसीन शेख रफीक याला देखील दोघांनी मारहाण केली. या बाबत यावल पोलीस ठाण्यात अख्तर शेख अय्युब याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे .

Protected Content