जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी मानव सेवा विद्यालयातर्फे जनजागृती करण्यात आले. जनजागृतीच्या कार्यात विविध क्षेत्रातून नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे. जनजागृतीच्या या कामात जळगावच्या चित्रकारांनीदेखील पुढाकार घेऊन शहरातील विविध चौकांमध्ये घोषवाक्यांसह जनजागृतीपर चित्र रेखाटले.
मानव सेवा विद्यालयातील कलाशिक्षक खान्देश कलारत्न पुरस्कार प्राप्त सुनिल दाभाडे व खान्देश कलारत्न पुरस्कार प्राप्त चित्रकार प्रेमकुमार सपकाळे या दोघं चित्रकारानी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन शहरातील सुभाष चौक रस्त्यावर आपल्या कलेचा माध्यमातून अहोरात्र आपल्यासाठी पोलिस, डाॅक्टर ,आरोग्य कर्मचारी, गरीबांना अन्न देणारे अन्नदाता, स्वच्छता कर्मचारी, शेतकरी इत्यादी विषयांवर चित्र काढून जनजागृती करण्यात आले. तसेच अनेक घोषवाक्य कोरोना थांबेल…घरी थांबा.., कोरोना नक्की थांबेल, तुम्ही सहकार्य करा…घरी थांबा…! , बाहेर जाणे टाळा, बाहेरून आल्यावर हात पाय साबणाने स्वच्छ धुवून घ्या. गर्दी मध्ये जाणे टाळा. अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारी सूचनांचे पालन करा.. असे घोषवाक्य म्हणून घेतले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. आर.एस.डाकलिया ,मानद सचिव विश्वनाथ जोशीं, सर्व पदाधिकारी सदस्य , खाजगी प्राथमिक महासंघाचे तालुका सचिव अजित चौधरी, पोलिस कर्मचारी वर्ग उपस्थित होते. चित्रकार सुनिल दाभाडे व चित्रकार प्रेमकुमार सपकाळे या दोघं चित्रकाराचे सगळीकडे कोरोनाविषयी जनजागृती केल्याबद्दल प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर ,बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील ,माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी व सर्व शिक्षकांनी कौतुक केले .