मुंबई (वृत्तसंस्था) देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत, अशा शब्दात भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवा्दीचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीवर टीका केली आहे.
राष्ट्रवा्दी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत लवकरच वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. मात्र निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊतांच्या मुलाखतीवर जोरदार टीका केली आहे. देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोक चिडली आहेत, इंटरव्यूमध्ये इंटरेस्ट कोणाला नाही. तसेच खरे कौशल्य लढ्यामध्ये असते बोलण्यामध्ये नाही, अशी टीका निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये केली आहे.