देशात २४ तासांत आढळले ५२ हजार करोनाबाधित रुग्ण ; ७७५ जणांचा मृत्त्यू !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील रुग्णसंख्येत ५० लाखांच्या वर वाढ झाली आहे. भारत केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, (३० जुलै) मागील २४ तासांत ५२,१२३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर ७७५ रुग्ण दगावल्याची माहिती दिली आहे.

 

मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना वाढीचा वेग वाढला आहे. ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण दिवसाला देशात आढळून येत असून, मागील २४ तासांतही रुग्णसंख्येची उच्चांकी नोंद झाली आहे. २४ तासात ५२ हजार करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या १५ लाख ८३ हजार ७९२ इतकी झाली आहे. तर याच कालावधीत देशभरात ७७५ जणांचा करोना संसर्गानं मृत्यू झाला आहे. भारतात पहिला कोरोना रुग्ण ३० जानेवारी रोजी सापडला होता.त्यानंतर १ लाख ते ५ लाख कोरोना रुग्णांची संख्या १४६ दिवसात पार झाली. मात्र ५ ते १५ लाखांचा आकडा गाठण्यासाठी केवळ ३२ दिवस लागले.

Protected Content