नागपूर (वृत्तसंस्था) खरंतर या देशात १०० कोटीहून अधिक हिंदू असल्यानेच देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे, हे वारिस पठाण यांनी लक्षात ठेवले पाहिजे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्यावर केली आहे.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलतांना फडणवीस म्हणाले की, वारिस पठाण यांचे वक्तव्य निंदनीय आहे. भारत हा सहिष्णू देश आहे. मात्र, हिंदू समाजाच्या सहिष्णूतेला जर हिंदू समाजाची दुर्बलता कुणी समजत असेल, तर तो त्यांचा मुर्खपणा ठरेल. त्यामुळे अशाप्रकारचे वक्तव्य या वक्तव्याबद्दल वारिस पठाण यांनी माफी मागितली पाहिजे. तसेच राज्य सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच खरंतर या देशात 100 कोटीहून अधिक हिंदू असल्यानेच देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे, हे वारिस पठाण यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अशाप्रकारे एखाद्या मुस्लीम राष्ट्रामध्ये कुणी बोलले असते, तर तेथे काय अवस्था झाली असती? हे वारिस पठाण यांनी लक्षात घ्यायला हवे, असेही फडणवीस यांनी म्हटले.