देशात आढळले कोविशील्डचे बनावट डोस !

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारत आणि युगांडामध्ये कोविशिल्ड लसीचे बनावट डोस आढळल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द सिरम इन्स्टिट्युटनं याला दुजोरा दिला आहे

 

कोविशिल्ड, कोवॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जात आहेत.  लसीकरणामुळे भिती काहीशी कमी होत असताना बनावट लसीमुळे ही भिती पुन्हा डोकं वर काढू लागली आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेन  यासंदर्भातला इशारा आपल्या संकेतस्थळावर देखील दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासणी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतामध्ये कोविशिल्ड लसीच्या २ एमएलच्या बनावट वायल्स आढळून आल्या आहेत. पण वास्तवात सिरम इन्स्टिट्युटकडून २ एमएलच्या वायल्स तयारच केल्या जात नाहीत. दुसरीकडे युगांडामध्ये १० ऑगस्टलाच एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोविशिल्ड लसींची एक बॅच दिसून आली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं यासंदर्भात अधिक जागरुकपणे काळजी घेण्याचं आवाहन देखील या देशांना केलं आहे.

 

Protected Content