Home आरोग्य देशातील १६ राज्यात कोरोनाचा फैलाव ; रुग्णांची संख्या १७१ वर

देशातील १६ राज्यात कोरोनाचा फैलाव ; रुग्णांची संख्या १७१ वर


 

नवी दिल्‍ली (वृत्तसंस्था) भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून १७१ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये २५ विदेशी नागरिक आहेत. दरम्यान, देशातील १६ राज्यात आतापर्यंत कोरोनाचा फैलाव झालेला आहे.

 

जगभरासह भारतात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. केंद्र तसेच सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्र सरकारकडून कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु आहेत. कोरोना व्हायरस आता देशभारतील विविध राज्यांमध्ये वाढत चालला आहे. सरकारने यासाठी आता हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे. यामध्‍ये कोरोनाशी संबंधीत माहिती मिळेल. +91-11-23978046 या हेल्‍पलाईन नंबरवर फोन करु शकता.


Protected Content

Play sound