नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजकारण बाजूला ठेवा, देशातील महत्त्वाचे राज्य म्हणून केंद्राने सहकार्य करावे, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. दरम्यान, मोदींनी सहकार्याचे आश्वासन दिले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून, भेटीचा तपशील सांगितला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मी अनेक वेळा दिल्लीत आलो होतो. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी त्यांना भेटायला आलो. भेटीत खूप चांगली चर्चा झाली. महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. केंद्राचे सहकार्य राज्याला मिळावे असे मी त्यांना सांगितले. त्यांनीही सहकार्य करु असं सांगितल. सीएए, एनआरपीबाबत देखील चर्चा केली. या सगळ्याबद्दल मी आगोदरच माझी भूमिका सांगितली आहे. विकासाच्या मुद्यावर चर्चा झाली. सीएएबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याची गरज नाही”, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.