देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारापेक्षा जास्त !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारापेक्षा जास्त झाली आहे. तर ७५ जणांना प्राण गमवावे लागले. कोरोनाचा सर्वाधिक धोका हा २१ ते ४० वर्षे वयोगटातील लोकांना असल्याची माहिती समोर आली आहे.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत ३०७२ लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. या पैकी २१२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत एकूण ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली लगत असलेल्या एनसीआर परिसरातही तीव्र गतीने पसरत आहे. शनिवारी एनसीआरमध्ये ४३ रुग्ण आढळले. दिल्लीत २४ तासांमध्ये ५९ नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्रातही सर्वाधिक ६३५ रुग्ण असून जळगावमध्ये रात्री उशिरा दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे. या दोघांवर शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते.

Protected Content