देशभरात ३,३०३ कोरोना रूग्णांचा मृत्यू

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मागील २४ तासात देशभरात १ लाख ३२ हजार ०६२ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ८० हजार ८३४ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. ३ हजार ३०३ बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

 

 

देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण  कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर,   परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या  बाधितांच्या तुलनेत  मुक्त होणाऱ्याची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे. देशातील रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ सुरू आहे. असे असले तरी अद्यापही बाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच असल्याने चिंता कायम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली  आहे.

 

 

देशातील एकूण बाधितांची संख्या २,९४,३९,९८९ झाली असून, आजपर्यंत २,८०,४३,४४६ रूग्ण बरे झाल्याने रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. देशभरात आजपर्यंत ३,७०,३८४ बाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव्ह रूग्ण संख्या १०,२६,१५९ आहे.

 

 

देशात लसीकरण मोहीमेअंतर्गत आजपर्यंत २५,३१,९५,०४८ लोकांचे लसीकरण झाले आहे. देशभरात १२ जून पर्यंत ३७,८१,३२,४७४ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी १९,००,३१२ नमुन्यांची काल तपासणी झालेली आहे.

 

Protected Content