देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण

 

मुंबई : वृत्तसंस्था । येत्या १६ जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण सुरु होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि आरोग्यसेवेत अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल.

अंदाज ३ कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या गटाला लस दिली जाईल. यामध्ये तब्बल २७ कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. सीरमनं उत्पादीत केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्स या दोन लसींचं लसीकरण करण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वर्षभराच्या आतच भारताने कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. संपूर्ण देशात येत्या दहा दिवसात कधीही कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होईल, अशीही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

आरोग्य विभागातील कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केले. सैन्य दल आणि पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांना कोवीन अ‌ॅपवर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. सामान्य व्यक्तींना कोरोना लसीसाठी नोंदणी करावी लागेल.

कोरोना लस ही प्रत्येक बूथवर पोहोचण्यासाठी पूर्ण सिस्टम तयार करण्यात आली आहे. प्रत्येक राज्याने यासाठी युनिट तयार केले आहे. यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो.

मुंबई, कर्नाल, चेन्नई आणि कोलकातामध्ये या चार प्रमुख ठिकाणांवर कोरोना लसीकरणाचा साठा केला जाणार आहे. त्यानंतर ३७ पुढील टप्प्यात लसीकरण ठिकाणांवर लस साठवली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. लसीच्या वाहतुकीसाठी विमानसेवेचा वापर केला जाणार आहे.
१६ जानेवारीपासून होणाऱ्या कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. “लसीकरणाची संपूर्ण तयारी राज्यात झाली आहे, ज्या क्षणाला केंद्र सरकार लसीची उपलब्धता करून देईल आम्ही लसीकरण सुरू करू. कोल्डचेनही तयार आहे, काही कमतरता आहे ती दूर करु. पहिल्या टप्प्यात ८ लाख आरोग्यसेवकांना लस देऊ” असं राजेश टोपे म्हणाले.

Protected Content