देशभरात लॉकडाउन वाढण्याची शक्यता !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाग्रस्तांची संख्या जेथे आधिक (हॉटस्पॉट) आहे. तिथे लॉकडाउन आधिक कडक करण्यात येणार आहेत. त्यानुसार दिल्लीसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, प. बंगाल, पंजाब आणि ओडिसा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही लॉकडाउन वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील परिस्थितीचा आढावा घेणार असून रूग्णांमध्ये होणारी वाढ पाहाता पंतप्रधान मोदी देशातील लॉकडाउन वाढविण्याची शक्यता आहे.

 

शिवसेनेचे मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’मध्ये मात्र मुंबईसारख्या हॉटस्पॉट शहरांमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तीन मे रोजी देशातील लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे. त्यासाठी फक्त सहा दिवस बाकी आहे. त्यापूर्वी देशातील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील परिस्थितीचे मुल्यमापन केले असून लॉकडाउनचा कालावधी वाढण्याबाबात विचार करत आहे. करोना व्हायरससाठी नेमलेल्या दिल्ली सरकारच्या विशेष समितीने राजधानीत १६ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. दिल्लीतील केजरीवाल सरकारनेही लॉकडाउनचा कालावधी तीन मे नंतर पुढे आणखी वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, आज, (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मागील काही दिवसांमधील कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये होणारी वाढ पाहाता पंतप्रधान मोदी देशातील लॉकडाउन वाढविण्याची शक्यता आहे.

Protected Content