Home आरोग्य देशभरात मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ६०१ नवे करोनाबाधित !

देशभरात मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ६०१ नवे करोनाबाधित !

0
33


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ६०१ नवे करोनाबाधित आढळले व ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ वर पोहचली आहे.

 

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ३९ हजार ९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १५ लाख ८३ हजार ४९० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४५ हजार ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याप्रमाणे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार देशात ऍक्टीव्ह कोरोना २८.२१ टक्के आहे. तर या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६९.८० टक्के असून मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १.९९ टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे


Protected Content

Play sound