विरोधी पक्षाने महिलांच्या बाबतीत जरा संयमाने बोलावं : सुप्रिया सुळे (व्हीडीओ)

जळगाव (प्रतिनिधी)  प्रत्येक महिलेला बांगड्यांचा अभिमान असतो. ज्या बांगड्या सावित्रीबाई फुले यांनी घातल्या आणि शिक्षणाची गंगा आली. ताराराणींनी घातल्या आणि त्या लढल्या. जिजाऊ मातेने घातल्या आणि शिवबा जन्माला आले. परंतु दुर्दैवाने राज्यातील विरोधी पक्षाने त्याच बागड्यांच्या विषयावरून महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी यापुढे बोलतांना जरा संयमाने आणि बुरीने बोलावं, असा सल्ला राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एका जाहीर सभेत बोलताना राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील पण आम्ही नाही, असे विधान केले होते. त्याला उत्तर देताना शहरातील राष्ट्रवादी कार्यालयातील पत्रकार परिषद खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. बांगड्यां या दुर्बलतेचे नव्हे तर, ताकदीचे लक्षण आहे. या बांगड्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्रपती देशात आलेले असतांना अशा पद्धतीने दंगल होणे, हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. दंगलीच्या काळात गृहमंत्रालय नेमकं काय करत होते? याची चौकशी पंतप्रधान कार्यालयातून झाली पाहिजे. परंतू ‘इंटेलिजन्स फेल्युअर’ची नैतिक जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी पुन्हा एकदा केली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/630888244395370/?__tn__=%2CdkC-R&eid=ARBEphMakFmkxfrqYU7JvMrQSwPehHdOG7_pu16QRLIDPmdqsZsHbtPgpzZXm_nnqXV1vYlOLP5WK4jz&hc_ref=ART0s6vpGit8zTjije4-eTN-twCc0cczh2ZWPBf_n_ww6Biu26hdNnaApokcW-87SM8

Protected Content