दुसऱ्या वनडेसाठी पंतच्या जागी के.एस.भरतला संधी

s.k. bharat

 

मुंबई प्रतिनिधी । मुंबईत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नियमित यष्टीरक्षक ऋषभ पंतला फलंदाजी करताना दुखापत झाली. पंत सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेतून त्याला आराम देण्यात आला असून भारतीय संघाने पंतच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून आंध्र प्रदेशच्या के.एस.भरत याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी विकेटकीपर संधी दिली आहे.

के.एस भरतला भारतीय संघाकडून बोलवणे आले तेव्हा तो हैदराबादमध्ये होता. त्याला तात्काळ राजकोटसाठी रवाना झाला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भरतला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. पण, राहुलला दुखापत झाल्यास भरतकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल. सध्याच्या युवा यष्टीरक्षकांपेक्षा के.एस भरतकडे यष्टीरक्षणाचे तंत्र चांगले आहे. प्रथम श्रेणी सामन्यात भरतने चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजीमध्ये देखील त्याने सातत्य ठेवले आहे. भरतने ७४ प्रथम श्रेणी सामन्यात ४ हजार १४३ धावा केल्या असून त्यात ९ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणीमध्ये त्याच्या नावावर एका त्रिशतकाची देखील नोंद आहे. यष्टीरक्षण करताना त्याने ५४ झेल, तर ११ विकेट घेतल्या आहेत.

Protected Content