मुक्ताईनगर प्रतिनिधी । दुचाकी विक्रीत खोटा क्रमांक देऊन एकाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला वर्षभरानंतर अटक केली आहे. दरम्यान बुधवारी संशयितास न्यायालयात हजर केले असता त्याला एका दिवसाचीपोलीस कोठडी देण्यात आली आहे.
शिवराज ब्रिजलाल पाटील वय ४० रा.गोदावरीनगर ,मुक्ताईनगर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याविरोधात जानेवारी २०१९ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी शेख इसाक शेख करीम मनियार वय 60 रा.गोदावरी नगर मुक्ताईनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी शिवराज ब्रिजलाल पाटील यांच्याकडे मुक्ताईनगर येथे यामाहा या कंपनीचे शोरूम होते. फिर्यादीने आरोपीकडून यामाहा कंपनीची 97 हजार 500 रुपये किमतीची मोटर सायकल घेतली होती. यासंदर्भात व्यवहार करताना चाळीस हजार रुपये रोख देखील घेतलेले होते व बाकीचे कर्ज मिळवून देऊ असे सांगण्यात आले. सदर वेळेस गाडीला पासिंग नंबर एमएच 19 सीपी 28 92 असा देण्यात आला मात्र हा नंबर दुसऱ्या गाडीचा निघाला. म्हणजेच मला चुकीचा नंबर देऊन फसवणूक करण्यात आली त्यानंतर उर्वरित रकमेचे हप्ते देखील मला भरण्यास सांगितले. या संदर्भात मी लोकसुविधा फायनान्स मुख्य कार्यालय जळगाव येथे जाऊन खात्री केली असता 41 हजार 727 रुपये भरणे बाकी असल्याचे सांगण्यात आले व मोटरसायकलचे आरसी बुक पंधरा दिवसात मिळेल असेही सांगण्यात आले. 26 ऑक्टोबर 2017 रोजी लोकसुविधा कार्यालयात उर्वरित रोख रक्कम भरली व सुविधा कंपनीच्या शिक्क्याची पावती व हप्ते भरणा केल्याचे विवरणपत्र देखील मिळाले. मात्र पंधरा दिवस होऊनही मोटरसायकलचे आरसी बुक मिळाले नाही म्हणून मी उज्वल यामाहा शोरूम चे मालक शिवराज पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काळजी करू नका, असे सांगितले. मात्र त्यानंतर माझी फसवणूक झाल्याचे मला लक्षात आले. मला देण्यात आलेली मोटरसायकल क्रमांक हा अनिल मराठे यांच्या हिरो कंपनीच्या सी डी एच एफ डिलक्स नावे असल्याचे लक्षात आल्याने माझी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आपण पुन्हा शिवराज पाटील यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला mh19 डी जी 80 19 हा नंबर दिला मात्र तो तपासणी केली असता तो नंबर बजाज प्लेटिना कंपनीचा असून किशोर महाजन यांचे नावे असल्याचे समजले. यावरून माझी 100 टक्के फसवणूक झाल्याचे मला लक्षात आले. दरम्यान मुक्ताईनगर पोलिसात मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील आठ ते दहा जणांनी याच प्रकारची फसवणूक केल्याचे मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिली होती.