जळगाव प्रतिनिधी । मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेला संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील २०१८ मध्ये मोटारसायकल चोरी गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी जळगाव शहरातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले होते. संशयित आरोपी दिनेश नामदेव पवार (वय-32) रा. माळेगाव ठोकर ता. कन्नड जि. औरंगाबाद हा मुळगावी असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाल्यानंतर मुळगावी त्याला अटक केली. संशयित आरोपीच्या ताब्यातील ८० हजार रूपये किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहे. संशयित आरोपीवर औरंगाबाद जिल्ह्यातील बेगमपूरा पोलीस ठाण्यात मोटारसायकली चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, भडगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीची मोटारसायकल संशयित आरोपीने काढून दिल्यात. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षिक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्या सुचनेनुसार पोहेकॉ कमलाकर बागुल, पो.ना. महेश महाजन, पो.ना. विजय पाटील, पो.ना. नंदलाल पाटील, पो.कॉ.सचिन महाजन, पो.कॉ. भगवान पाटील यांनी कारवाई केली.