कोरोना योध्द्याला रक्तदानातून श्रध्दांजली

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा प्रतिकार करतांना मृत झालेले येथील पोलीस कर्मचारी गोपाळ भोई यांनी रक्तदानाच्या माध्यमातून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

येथील शहर पोलीस स्थानकात कार्यरत असणारे पोलिस नाईक गोपाळ विठ्ठल भोई यांचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ कोरोना काळात गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे. त्यांची फरफट होऊ नये. यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याला अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आमदार मंगेश चव्हाण यांनी यात स्वत: रक्तदान केले. यात ७५ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. या शिबिरासाठी लाईफ सेव्हर ग्रुप व दृष्टी फाऊंडेशनचे यासाठी सहकार्य लाभले.

यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, आर.डी.चौधरी, उद्धवराव महाजन, किसनराव जोर्वेकर, पालिकेचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक अरुण अहिरे, एम.बी.पाटील, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content