चाळीसगाव, प्रतिनिधी । कन्नड घाटातील म्हसोबा मंदिरासमोरून अज्ञाताने लांबवलेल्या दुचाकी बाबत न्यायालयाने मंगळवार रोजी दिलेल्या निकालात आरोपीला दोन महिन्याचे कारावास व ५०० रूपयांचे दंड ठोठावण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, हमीहखॉं मेहताब खॉं पठाण (वय-३८ रा. भांबरवाडी ता. कन्नड) येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दरम्यान कन्नड घाटातील म्हसोबा मंदिरासमोर त्यांनी दुचाकी (क्र. एम.एच.२० डीएक्स- ५७४४) ८ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास लावलेली असताना अज्ञात इसमाने ती चोरून नेली होती. याबाबत त्यांनी लागलीच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुरन: ३१२/२०२१ भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ युवराज नाईक, पोना नितीन अमोदकर व पोना भुपेश वंजारी या पथकाची नियुक्ती करण्यात आली. आरोपी हा येवला जि. नाशिक येथे असल्याची गुप्त माहिती सदर पथकाला मिळाली. त्यावर पथकाने सदर ठिकाण गाठून रूद्रे कामी (वय-१९ रा. भेरी गंगा, नेपाळ) या आरोपीला दुचाकी बरोबर ताब्यात घेतले. ग्रामीण पोलिसांनी शोध घेऊन अवघ्या ३६ तासात चोरट्याला ताब्यात घेतल्याने याबाबत ग्रामीण पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना शंकर जंजाळे व राजेंद्र साळुंखे यांनी पुढील तपास दोन दिवसात पूर्ण करून पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली १० जून रोजी आरोपीसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालय-३ चे न्यायाधीश एम.व्ही.भागवत यांनी गुन्ह्यातील तपास जलद गतीने करून अवघ्या तीन आठवड्यात मंगळवार रोजी निकाल देऊन आरोपीला दोन महिन्यांचे कारावास व ५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आले आहे.