जैन मुनींना मारहाणप्रकरणी चाळीसगावी निषेध; आंदोलनाचा इशारा 

WhatsApp Image 2019 03 10 at 2.23.38 PM

चाळीसगाव (प्रतिनीधी)। शिरूर तालुक्यातील कवठे गावात एका समाजकंटकाने जैन मुलींना केलेल्या मारहाणीचा चाळीसगाव येथे समस्त सकल जैन समाज, खुशाल भाऊ मित्र मंडळ व रयत सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला असून मारहाण करणाऱ्यास अटक करून तात्काळ कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे रविवारी चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक व तहसीलदार चाळीसगाव यांना देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी जैन मुनि पायी प्रवास करीत असतात एक जैन मुनी हे ४ जणांसोबत शिरूर येथून भीमाशंकर रोड वरून  मंचर कडे  जात असताना गुंजाळवाडी कवठे येमाई येथे हे एका समाजकंटकाने मुलींना लोखंडी गजाने  जबर मारहाण केली  स्थानिक लोकांनी  मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील या समाजकंटकाने  मारहाण केली आहे. धर्माबरोबर मानवतेचा संदेश देत गावागावात एक वेगळी विचारधारा घेऊन जाणाऱ्या या जैन मुनी पासून  कुणाला कसलाही त्रास नसताना मारहाणीचा प्रकार अतिशय निंदनीय असून  याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे

निवेदनावर यांच्या आहे स्वाक्षऱ्या
सदर समाजकंटकास त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा खुशाल भाऊ मित्र मंडळ व सकल जैन समाजाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर खुशाल पाटील, रयत सेनेचे गणेश पवार, मनोज सोलंकी, प्रितेश कटारिया, हरेश जैन, प्रमोद गुळेचा, संदीप जैन, विनोद पारख, कुशल सोळंकी, सुशिल जैन, महेंद्र आचलिया, हितेश जैन, संदीप बेदमुथा, रोशन गुळेचा, प्रवीण चोपडा, दर्शन मेहता, सचिन जैन, पारस आचलिया, प्रेमचंद खिवसरा, मयूर सोळंकी, मनीष लोडाया, नयनसुख कोठारी, नयना ब्रम्हेचा,  महेश कुमट, राजेश बागरचा आदी जैन समाज बांधवांच्या सह्या आहेत.

Add Comment

Protected Content