जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या दुचाकींसह एका संशयित आरोपीला शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गोलाणी मार्केटमधून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या महिनाभरात अनेक दुचाकींची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीला आणण्याबाबत बाबत विशेष सूचना दिल्या होत्या. याबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी डी.बी. पथक तयार करून दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील शोध पथकातील पथकाने सापळा रचून संशयित आरोपी इब्राहीम मुसा तांबोळी (वय-२६) रा. तोंडापूर ता.जामनेर जि.जळगाव याला मोठ्या शिताफीने शहरातील गोलाणी मार्केटमधून शहरातून अटक केली आहे. त्याने १५ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली असून १० मोटरसायकली काढून दिल्यात. याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. भास्कर ठाकरे, पो.कॉ. पोलीस कॉन्स्टेबल, प्रणेश ठाकूर, पोहेकॉ विजय निकुंभ, पो.कॉ. उमेश भांडारकर, संतोष खवले, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, किशोर निकुंभ, तेजस मराठे योगेश इंधाटे यांनी कारवाई केली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/272426511478191