जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी येथील विवाहितेला कौटुंबिक कारणासह माहेरहून व्यवसाय करण्यासाठी दीड लाखांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, याजळगाव तालुक्यातील खेडी येथील माहेर असलेल्या शिल्पा मनोज राठोड यांचा विवाह पाचोरा तालुक्यातील तरडी तांडा येथील मनोज बंकट राठोड यांच्याशी डिसेंबर -२०२० मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या दोन महिन्यानंतर विवाहितेला तिच्या माहेरहून व्यवसाय करण्यासाठी दीड लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेच्या आई वडिलांची परिस्थिती हालाखीचे असल्यामुळे त्यांनी पैसे आणले नाही याचा राग आल्याने पती मनोज राठोड याने विवाहितेला मारहाण व शिवीगाळ केली तसेच सासू सासरे दीर व नणंद यांनी देखील छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता खेडी येथे माहेरी निघून आल्या. मंगळवार २१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मनोज बंकट राठोड, संगीता बंकट राठोड, बंकट रायसिंग राठोड, विनोद बंकट राठोड आणि सुनीता विजय पवार रा. तरडी तांडा ता. पाचोरा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. सुनील सोनार करीत आहे.