बलरामपूर (वृत्तसंस्था) कोरोनाविरोधातील लढाईतील एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (काल) रात्री ९ वाजता ९ मिनिटं दिवा, मेणबत्ती, टॉर्च पेटवण्याचे आवाहन केले होते. परंतू उत्तर प्रदेशातील बलरामपूरच्या भाजपा जिल्हाध्यक्ष मंजू तिवारींनी चक्क हवेत गोळीबार केल्यामुळे खळबळ उडाली होती. म्हणजे त्यांनी स्वत: हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला.
भाजपा महिला जिल्हाध्यक्ष मंजू तिवारी यांनी बंदुकीतून गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी स्वत: हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करत ‘दिवा पेटवल्यानंतर कोरोनाला पळवताना’ असे शीर्षक व्हिडीओला दिले. त्यानंतर तो व्हायरल झाला. या व्हीडीओ मध्ये तिवारी या बंदुकीतून गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहेत. गोळीबार करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे आता मंजू तिवारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
बलरामपुर-कोरोना भगाने के लिए बीजेपी महिला जिलाध्यक्ष ने की फायरिंग, कोरोना भगाने के लिए रिवाल्वर से की फायरिंग, फायरिंग का वीडियो फेसबुक पर किया अपलोड,दीप जलाने के बाद कोरोना भगाने के लिए की फायरिंग, मंजू तिवारी है बीजेपी की महिला जिलाध्यक्ष @myogiadityanath #9बजे9मिनट pic.twitter.com/iwCP89Y6uz
— DINESH SHARMA (@dinujournalist) April 5, 2020