चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड् न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चैतन्य तांड्यात दिवाळी सण आनंदात साजरी करता यावी यासाठी योजनेअंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांच्या कुटुंबियांना आज आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले.
दरवर्षी दिवाळी सण हे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. परंतु गरीबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी आज तालुक्यातील चैतन्य तांड्यात दक्षता समिती अध्यक्ष, सरपंच अनिता दिनकर राठोड व उपसरपंच आनंदा राठोड यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले. या शिध्यात प्रामुख्याने तेल, साखर, पोहे, चना दाळ, रवा व मेदा आदींचा समावेश आहे.
तत्पूर्वी दिवाळीच्या आठ दिवसांपूर्वी शिधावाटप करणारी चैतन्य तांडा हि पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. याबाबत ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानासह ग्रामपंचायतीचे यावेळी आभार मानले. याप्रसंगी करगाव विकास सोसायटी चेअरमन दिनकर राठोड, सदस्य भावलाल चव्हाण, वसंत राठोड, राजेंद्र चव्हाण, मधुकर राठोड, पदम तवर्, पंडित राठोड व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.