नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ईशान्य दिल्लीत रविवारपासून सुरु असलेल्या हिंसाचारातील मृतांचा आकडा आता ३४वर पोहोचला आहे.
दिल्लीत रविवारपासून सुरु असलेला हिंसाचार आता थांबला असून या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, आज दोघांचे मृतदेह एका नाल्यामध्ये सापडले. त्यानंतर या हिंसाचारामधील मृतांचा आकडा ३४वर पोहोचला. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी राष्ट्रपती रामनात कोविंद यांची भेट घेतली. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारासंबंधी एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये हिंसाचारग्रस्त भागातील लोकांना दिलासा देण्याबाबत चर्चा होणार आहे.