दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आयुक्त पटनाईक यांची बदली करण्यात असून त्यांच्या जागी एसएन श्रीवास्तव यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी बदलीच्या वृत्ताला दुजोरा दिला.
दिल्लीतील या हिंसाचारात आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत हिंसाचारामुळे दिल्ली पोलिसांवर देशभरातून मोठया प्रमाणात टीका सुरु आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमूल्य पटनायक यांच्याजागी एसएन श्रीवास्तव यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एसएन श्रीवास्तव १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना सीआरपीएफमधून पुन्हा दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी आणण्यात आले आहे. एसएन श्रीवास्तव यांच्या कार्यकाळात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीएल मॅच फिक्सिंगचा खुलासा केला होता.