Home राजकीय दिल्लीत सत्याचा विजय झाला : रोहित पवार

दिल्लीत सत्याचा विजय झाला : रोहित पवार


rohit pawar

अहमदनगर (वृत्तसंस्था) ‘दिल्लीत सत्याचा विजय झाला आहे. लोकांना सरकारकडून आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षणासारख्या मूलभूत विषयांवर काम व्हावे अशी मुख्य अपेक्षा असते. ते देणाऱ्या व देण्याचे आश्वासन देणाऱ्या पक्षालाच दिल्लीकरांनी विजयी केले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

 

रोहित पवार यांनी दिल्ली निकालावर प्रतिक्रिया देतांना भाजपवर टीका केली आहे. भाजपने दिल्लीसाठी पूर्ण जोर लावला होता. त्यांचे १२ मुख्यमंत्री, महाराष्ट्रासह विविध राज्यांतील माजी मंत्री, ६०० पेक्षा जास्त पदाधिकारी दिल्लीत तळ ठोकून होत्या. खुदद् केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभा घेतल्या. अनेकांच्या म्हणण्यानुसार पैशाचाही बराच वापर झाला. मात्र, लोकांनी हे सगळे नाकारले. लोकांनी योग्य तोच निर्णय घेतला. दिल्लीत भाजपच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. असेच होत राहिले आणि महाराष्ट्राप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सर्व पक्ष एकत्र आले तर भाजपच्या विचारांचे देशभर डी-फॉरेस्ट्रेशन होईल,’ असे भाकीतही रोहित पवार यांनी वर्तवले आहे.


Protected Content

Play sound