Home आरोग्य दिल्लीत भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या !

दिल्लीत भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत भाजपा नेते राहुल सिंग उर्फ भुरु सिंग यांची आज सकाळी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

 

राहुल सिंग मॉर्निंग वॉकला बाहेर पडल्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. पूर्व दिल्लीतील पश्चिम विनोद नगर येथील मयूर पब्लिक स्कूलजवळ हल्लेखोरांनी त्यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या. 8 महिन्यांपूर्वीही राहुल सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. पण त्यातून ते बचावले होते. या हत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. दरम्यान, दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली असून आरोपींच्या शोधार्थ पथकं रवाना केले आहेत.


Protected Content

Play sound