नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानी दिल्लीत उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
राजधानी दिल्लीत उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या १३ लोकांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, दिल्लीत २८ ते ३१ मे दरम्यान सलग हजार पेक्षा अधिक करोनाबाधित रुग्णांची दिल्लीत नोंद झाली होती. तर १ जून रोजी ९९० रुग्ण आढळले होते. दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या २० हजार ८३४ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५२३ झाली आहे. दरम्यान, उपराज्यपाल अनिल बैजल यांचे कार्यालय सील देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.