यावल (प्रतिनिधी)। शहरातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरातील राहणारा तरूण पहिला कोरोनाबाधित आढळून आला होता. त्या तरूणाचा दुसरा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने अखेर त्याची विलगीकरण कक्षातुन सुटका करण्यात आली.
यावल तालुक्यात मागील २० दिवसांपासुन कोरोनाबाधीत रुग्णांची आकडेवारी दिवसेंपासून वाढत चालली असतांना दुसरीकडे मात्र एक आशादायी आंनदाची बातमीसमोर आली आहे. यावल शहरात सर्वप्रथम कोरोनाबाधीत रुग्ण म्हणुन आढळुन आलेल्या २० वर्षीय डॉक्टर पुत्र विलगीकरण कक्षा असताना त्याचा दुसरा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याची विलगीकरण कक्षातुन अखेर सुटका करण्यात आली आहे. तरूण आपल्या घरी आल्यावर सुर्दशन चित्र मंदीर परिसरातील नागरीकांनी त्याच्या अंगावर गुलाबपुष्प उधळुन त्याचे स्वागत केले. यावल शहरात कोरोना बाधीतांची आकडेवारी धक्कादायक रित्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर एक मोठे आवाहन उभे राहीले आहे.