जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयात दाखल असलेले सात कोरानाबाधित रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती रूग्णालयाचे प्रभारी डीन डॉ. मारोती पोते यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्यूजला दिली.
गेल्या दहा दिवसांपासून ७ कोरोनाबाधित रूग्ण जिल्हा कोवीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल होते. त्याचा आज दुसरा अहवाल जिल्हा कोवीड रूग्णालयात प्राप्त झाला असून सातही रूग्ण कोरानामुक्त झाले असून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य विभागाला दिलासा देणारे वृत्त जरी असले तरी मात्र जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. जिल्हाभरात आत्तापर्यंत १७९ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यात ४७ जणांचा मृत्यू झाला तर १६२ जणांवर कोवीड रूग्णालयात व कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. तरी नागरीकांना खबरदारी म्हणून विनाकारण शहरात फिरू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असेही आवाहन डॉ. पोते यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४००च्या उंबरठ्यावर आली आहे. बाधितांची संख्या ३८८ वर पोहचली आहे. आज २३ मे रोजी सात जणांचा अहवाला पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.